C.D.DESHMUKH


१४ जानेवारी हा दिवस सी.डी.देशमुखांचा जन्मदिवस. सी.डी. यांचा जन्म १४ जानेवारी  १८९६ रोजी महाडमधील नाते गावात झाला. त्यांची आई  वेणू उर्फ भागीरथीबाई  ही रावसाहेब बळवंतराव महागवकरांची कन्या. त्यांचा विवाह द्वारकानाथ गणेश देशमुख यांच्याशी १८९० मध्ये झाला. नाते हे महागवकरांचे गाव. देशमुख घराणे हे इंग्रजांच्या शासकीय सेवेत सेवेत रुजू होते. सी.डी. यांचे आजोबा गणेश देशमुख बडोदा प्रांतात पोलीस होते. सी.डी. यांचे वडील रोहा येथे वकील होते. सी.डी. यांच्या आई लग्नानंतर मराठी आणि संस्कृत शिकल्या होत्या. आपल्या मुलाची बुद्धिमत्ता पारखून धारप गुरुजींकडून त्यांची प्राथमिक तयारी करून घेतली. त्यावेळच्या नियमानुसार मॅट्रिकच्या परीक्षेस बसण्यासाठी वयाची सोळा वर्षे पूर्ण व्हावी लागत. सी.डी. मात्र सी.डी. मात्र तेराव्या वर्षीच १९१२ मध्ये ही परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांना जगन्नाथ शंकरशेठ शिष्याव्रीत्ती देखील मिळाली. याकरिता त्यांना लागू सरांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल राम गणेश गडकरी यांनी त्यांच्यावर ‘आनंद वर्धापन’ ही कविता लिहिली. गडकरी यांना सी.डी. यांचा फोटो देखील हवा होता. मात्र लागू सरांनी  तो काढू दिला नाही. सी.डी. यांनी एलफिस्टन महाविद्यालयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत पदवी परीक्षा पास केली. त्यांचे शिक्षक प्रो. म्युलर आणि प्रो. अँडरसन यांनी सी.डी.ना केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश मिळावा म्हणून मिलचे साहाय्य केले. सर् गोविंदराव प्रधान , वागले आणि जयवंत यांनी ‘हिंदू शिक्षण फंडातून अआर्थिक साहाय्य मिळवून दिले. केम्ब्रीज्मध्ये ही सी.डी. यांनी आपल्या अद्भूत बुद्धिमत्तेने सर्वांना थक्क केले. १९१७ मध्ये ट्रायपास साठी त्यानी बॉटनी, केमिस्ट्री व  जीऑलॉजी या विषयात फ्रांक स्मार्ट बक्षीस मिळवले. यानंतर सी.डी. नी आय. सी. एस. परीक्षा दिली. त्या काली ही परीक्षा फक्त लंडनला होत असे. अतिशय अवघड अशा ६००० मार्कांपैकी त्यांना ३५२० मार्क मिळाले. याही वेळेस त्यांनी पहिला क्रमांक सोडला नाही. या काळात लंडनमध्ये त्यांना रोझीना भेटली. कालांतराने ते रोझीनाशी विवाहबद्ध झाले. याच काळात त्यांनी बॅरिस्टारची पहिली व दुसरी परीक्षा दिली. दुर्दैवाने पैशाअभावी त्यांना शेवटची परीक्षा देता आली नाही. यानंतर सी.डी. यांची भारतीय नागरी सेवेतील (आय.सी.एस.) प्रदीर्घ कारकीर्द सुरु झाली. सुमारे एकवीस वर्षे ते आय.सी.एस. सेवेत होते. रेवेन्यू सेक्रेटरी व फायनान्स सेक्रेटरी पद भूषवणारे ते सर्वात तरुण अधिकारी होते. या काळात ते इंग्रज सरकारच्या सेंट्रल आणि बेरार प्रांतात होते. लंडनला दुसऱ्या गोलमेज परिषदेत , ज्यात महात्मा गांधी यांनी भाग घेतला होता, त्यात सी.डी नी चिटणीस म्हणून काम पाहिले.इंग्रज केंद्र सरकार व प्रोविन्सेस यांच्यातील आर्थिक फेरबदलाचे काम सर् ऑटो निमेचार यांच्या सूचनांवर आधारित भारत सरकारच्या १९३५ सालच्या कायद्यानुसार झाले. याचा मसुदा सी.डी. नी तयार केला होता. त्याबद्दल त्यांची खूप प्रशंसा झाली. १९१७ च्या सुमारास लोकमान्य टिळकांच्या स्फूर्तीने भारतातील तरुण वर्ग स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्रेरित झाला होता. सी.डी. त्याला अपवाद नव्हते.   कॉंग्रेससचे अध्यक्ष लॉर्ड सिन्हा यांची त्यानी भेट घेतली.  ते लोकमान्यांना लंडनला भेटले आणि स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेण्याचा मनसुबा व्यक्त केला. त्यावेळेस लोकमान्यांनी त्यांना समजावले की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राज्यकारभार चालविण्यासाठी कुशल अधिकारी लागतील , हा सल्ला मानून ते प्रशासकीय सेवेतच राहिले. १९३९ मध्ये त्यांची नेमणूक रिझर्व बँकेचे Liaison Officer  म्हणून झाली. त्यानंतर ११ ऑगस्ट १९४३ ते ३०जुन १९४९ पर्यंत ते रिझर्व बँकेचे गवर्नर होते. सी.डी. हे रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गवर्नर होते. गवर्नर हाणून त्यांची कारकीर्द अविस्मरणीय होती. बँकेचे खाजगी बँकेतून राष्ट्रीयीकृत बँकेत रुपांतर करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. Industrial finance corporation of India, ग्रामीण पतपुरवठा योजना, बँक व्यवहारांची नियमावली बनवणे यात त्यांचा सिंहाचा वाट होता. जुलै १९४४ मध्ये ब्रेटोन वूड्स अमेरिका येथे जगातील मान्यवर अर्थाताद्न्यांची परिषद भरली होती. यातूनच पुढे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी  (IMF) आणि Industrial Bank for Reconstruction and Development (IBRD) अर्थात जागतिक बँकेचा जन्म झाला. या परिषदेत सी.डी. ना रिझर्व बँकेचे गवर्नर म्हणून मनाचे आमंत्रण होते. इतकेच नव्हे  तर या मातब्बर आंतरराष्ट्रीय संस्थांच्या कार्यकारी मंडळाचे ते तब्बल दहा वर्षे सदस्य होते. १९५० मध्ये त्यांनी आपल्या स्मरणशक्तीची एक झलक दाखवली. १९१७ च्या दरम्यान केम्ब्रिजला असताना त्यांनी फ्रेंच भाषा शिकली होती. आता पॅरीसमधील या परिषदेत त्यांनी चक्क अस्खलित फ्रेंचमध्ये भाषण केले. या काळात वैयक्तिक जीवनात त्यांना पत्नी रोझीनाच्या मृत्युला सामोरे जावे लागले. १३ ऑगस्ट १९४९ मध्ये ते रिझर्व बँकेचे   म्हणून निवृत्त झाले. निवृत्त जीवनात लंडनला बांधलेल्या ‘रोहा’ या घरात पत्नीसह निवांत जीवन जगण्याचा त्यांचा बेत सफल होऊ शकला नाही. त्यांची कन्या प्रिमरोझ ही देखील लंडनला होती. यानंतर सुरु झाली ती सी.डी. यांची स्वतंत्र भारताच्या प्रशासकीय सेवेतील प्रदीर्घ कारकीर्द. नवनिर्मित भारताला अनेक संस्था नव्याने स्थापन करायच्या होत्या. सप्टेंबर १९४९ मध्ये पंतप्रधान जवाहरलाला नेहरू यांनी त्यांची नेमणूक अमेरिका व युरोपचे विशेष आर्थिक राजदूत म्हणून केली. यात त्यांनी अमेरिकेकडून गव्हाचे कर्ज मिळवण्याच्या प्राथमिक वाटाघाटी केल्या. १ एप्रिल १९५० रोजी ते  भारताचे अर्थमंत्री झाले. पंजाबचे प्रतिनिधी म्हणून ते खासदार बनून संसदेत आले. जुलै १९५६ मध्ये राजीनामा देईपर्यंत ते त्या पदावर होते. १९५२ मध्ये केम्ब्रिज येथील जीझस कॉलेजने त्यांचा ऑनररी फेलो नेमून बहुमान केला. जगातील अनेक विद्यापीठांनी त्यांना ऑनररी डॉक्टरेटचा मान दिला. त्यात अमेरिकेची दिल्ली, पुणे, नागपूर, उस्मानिया, व इंडियन स्टॅटीस्टिकल इन्स्टिट्यूट देखील होती. सी.डीं. च्या कारकीर्दीत भारतीय अर्थकारणाला मानवी मूल्ये जोपासायायची सवय लागली. पहिल्या व दुसऱ्या पंचवार्षिक योजना राबवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. इंपिरीयल बँक ऑफ इंडिया तसेच आयुर्विमयाचे राष्ट्रीयीकरण करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

५ नोव्हेंबर १९५२ मध्ये त्यांच्या एकाकी वैयक्तिक जीवनाची पोकळी आंध्र प्रदेशच्या खासदार दुर्गाबाई यांनी भरून काढली. वित्तमंत्री असताना त्यांनी संस्कृतमध्ये दुर्गाबाईंना लग्नाचा प्रस्ताव मांडला होता. २२ जानेवारी १९५३ मध्ये हा विवाह संपन्न झाला. सुचेता कृपलानी व पं. नेहरू या विवाहाचे साक्षीदार होते. दुर्गाबाई देखील महिला परिषदेच्या कार्यकर्त्या , उत्कृष्ट वकील, खासदार, नियोजन मंडळाच्या सदस्य होत्या.

१९५६ मध्ये संयुक्त महाराष्ट्र आंदोलन उसळले. पं. नेहरू यांनी मुंबई शहराचे केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करायचे समजल्यावर या निर्णयाच्या विरोधात त्यांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला. हा त्यांचा बाणेदारपणा सर्वांच्या विशेष लक्षात राहिला.

यानंतर सी.डीं. ना विद्यापीठ अनुदान मंडळाचे अध्यक्ष (UGC) म्हणून पदभार सांभाळला. याचवेळी त्यांना उत्कृष्ट प्रशासकीय सेवेकरिता आशियातील सर्वोच्च मेगॅसेसे पुरस्कार देखील मिळाला. मूळच्या साहित्यिक आणि निसर्गप्रेमी  व संस्कृतप्रेमी अशा सी. डीं. नी भारताच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोलाची मुलभूत कामगिरी केली.

१९५८ मध्ये नेहरूंच्या स्फूर्तीने त्यांनी ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’ ह्या दिल्लीतील एका महत्वाच्या संस्कृतिक केंद्रची स्थापना केली. येथे विविध विषयावर चर्चा, परीसांवाद, परिषद , नृत्य, नाटक, गायन यासारखे संस्कृतिक कार्यक्रम होतात. या संस्थेच्या देखण्या वास्तुची रचना विशेषत: त्याच्या सुंदर बगीच्याचा  आराखडा त्यानीच तयार केला. १९६८ मध्ये त्यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली. पण त्यात त्यांना यश आले नाही. १९७४ मध्ये देश्नुख पती – पत्नींना भारत सरकारने ‘पद्मविभूषण’ किताब देऊन त्यांचा योग्य गौरव केला.

यानंतर निवृत्त जीवनात त्यांनी आपल्या साहित्यक्षेत्रात  मनसोक्त मुशाफिरी केली. संस्कृत भाषा त्यांचा अतिशय जीव्ह्याळयाचा विषय. लहानपणी त्यांच्या वडिलांनी त्यांना ‘अमरकोश’ मुखोद्गत करविला होता. त्यांच्या स्वत:च्या संस्कृत श्लोकांचा ‘संस्कृत काव्यमाला’ हा संग्रह प्रसिद्ध झाला आहे. गांधीजींच्या काही निवडक कवितांचे देखील त्यांनी संस्कृतमध्ये भाषांतर केले. रविंद्रनाथ टागोरांच्या काही कवितांचा देखील त्यांनी मराठीत अनुवाद केला.

Gems from the  Amarkosh या पुस्तकात त्यांनी अमरसिंहाने अमरकोशात दिलेल्या विविध झाडे, पक्षी, निसर्ग यांच्या संस्कृत शब्दांचे लॅटीनमध्ये भाषांतर केले आहे. ‘The Course of my life’ हे त्यांचे आणि  ‘Chintamani and I’ हे दुर्गाबाई यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहेत.

वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांचे हैदराबाद येथे २ ऑक्टोबर १९८२ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ रिझर्व बँक ‘सी.डी. देशमुख मेमोरियल लेक्चर्स’ आयोजित करते. सी.डी. यांची तीक्ष्ण बौद्धिक झेप, संस्कृत्वारचे प्रेम, विज्ञानाची समाज , बागकामाची आवड उल्लेखनीय होती. स्वातंत्र्यपूर्व भारतात तसेच नव स्वातंत्र्यप्राप्त भारताच्या आर्थिक नियोजनात त्यांचा मोलाचा वाटा होता.

C. D. DESHMUKH


3 responses to “C.D.DESHMUKH”

  1. Great to read your blog on C D Deshmukh. I had written a similar one in English earlier. But did not know about Ram Ganesh Gadakari’s kavita on him and his meet with Lokmanya Tilak, in which Tilak advised him to stay in his profession for the benefit of independent India. Would like to read more from you. Thanks – Arti

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.