दत्ताजी ताम्हाणे Dattaji Tamhane

दत्ताजींचा जन्म १३ एप्रिल १९१३ रोजी रत्नागिरी येथे झाला. शालेय जीवन कोकणातील श्रीवर्धन, हरणे इत्यादी ठिकाणी घालविल्यावर १९२२ नन्तर त्यांचे कुटुंब ठाण्यास आले. ठाण्याच्या एम. एच. व बी. जे. हायस्कूलमधून ते मॅट्रिक झाले. स्वातंत्र्य प्राप्तीच्या लालसेने झपाटलेल्या त्या काळापासून ते अलिप्त राहू शकले नाहीत. ठाणे शहरातून त्यांच्या राजकीय कारकीर्दीस सुरवात झाली. १९१९ मध्ये त्यांनी लोकमान्य टिळकांची भेट घेतली. ठाणे शहरातूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरवात झाली. ठाणे शहर, तालुका व जिल्हा कोंग्रेस कमिटीचे ते अध्यक्ष होते. महात्मा गांधींच्या ‘यंग इंडिया’ मासिकाचे संपादक स्वामी आनंदजी ठाण्यास वास्तव्यास असताना दत्ताजी त्यांच्या संपर्कात आले. याच काळात त्यांनी सरकारी नोकरी न करण्याचा व आजन्म अविवाहित राहण्याचा निश्चय केला. १९४५ च्या ‘चले जाव’ आंदोलनादरम्यान त्यांना दोन वर्षे कारावास भोगावा लागला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एक पर्व संपले. मात्र नव्या राजवटीतील नव्या प्रश्नांना तोंड देण्यासाठी आणि आम जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दत्ताजी कायम अग्रेसर राहिले. या काळात ते समाजवादी चळवळीत आपले सहकारी एस. एम. जोशी , ना.ग. गोरे अ आचार्य क्रिपलानी यांच्यासह सक्रीय होते. ठाणे जिल्ह्यातील जंगल कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी लढा छेडला. जव्हार संस्थानातील आदिवासींना मार्गदर्शन दिले. सहकारी शेतीचा प्रयोग करून पहिला. ठाणे जिल्हा शब्दश: त्यांनी पायी पिंजून काढला. आदिवासींच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच स्वताला झोकून दिले. धनिकांनी हादप्लेल्या या गरिबांच्या जमिनी त्यांना परत मिळवून दिल्या. त्यांनी लिहिलेल्या ‘कळीचा घोडा’ या कुळकायद्यावरील पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. गोवा मुक्ती संग्राम , संयुक्त महाराष्ट्र चळवळ यातदेखील त्यांचा सक्रीय सहभाग होता. १९६८ साली ते महाराष्ट्र विधानपरिषदेत निवडून आले. दत्ताजींनी आपल्या प्रभावी वक्तव्याने विधानपरिषद गाजविली आहे. सत्तारूढ आणि विरोधी पक्षात देखील मित्र परिवार असणारे दत्ताजी उभय पक्षात उत्तम सुसंवाद साधू शकतात. दत्ताजींनी चांद्रसेनीय कायस्थ परिवाराच्या सुसंवादासाठी देखील प्रयत्न केले. १९९२ च्या शतसांवत्सरिक परिषदेचे ते अध्यक्ष होते. या वेळेस अखिल भारतातील कायस्थानी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. दत्ताजींच्या एकंदर कर्तृत्वाचा आढावा घेतल्यास हे एक गंभीर व रुक्ष व्यक्तिमत्व असावे असे वाटते. परंतु दत्ताजिंना  अगदी पाकशास्त्र , होमेओपथी, बुद्धिबळ व प्रवास अशा अनेक विषयात आवड आहे.

*  ६ एप्रिल २०१४ रोजी वयाच्या १०१व्या वर्षी दीड महिन्याच्या आजारपणानंतर त्यांचे मुंबईतील मुलुंडच्या रुग्णालयात निधन झाले.

Advertisements

One thought on “दत्ताजी ताम्हाणे Dattaji Tamhane

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s